- अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाई करा…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर तातडीने कठोर कारवाई करण्याचे निर्देश डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. कारवाईनंतर मोकळ्या झालेल्या जागांवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी तेथे मुलांची खेळाची मैदाने आणि हरित क्षेत्र विकसित करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
महापालिकेच्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत शहर विकासकामे, नालेसफाई, पाणी समस्या आणि पावसाळापूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पावसाळ्यात पूरस्थिती टाळण्यासाठी नालेसफाईची कामे गुणवत्तापूर्ण पद्धतीने वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देत नाल्यांवरील अतिक्रमणे हटवण्यावरही भर देण्यात आला. तसेच पाणी चोरी रोखणे, उद्यानांची देखभाल आणि रस्ता रुंदीकरण कामांचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.














