न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १८ मे २०२६) :- चिंचवड येथील प्रिमियर प्लाझा समोर पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असल्याची घटना समोर आली आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग नागरिकांना सातत्याने पाणी जपून वापरण्याचे आवाहन करत असताना अशा प्रकारच्या गळतीकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.
संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.














