- पिंपरीत धारदार सत्तुरसह फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घातक शस्त्रे बाळगण्यास मनाई आदेश लागू असताना, धारदार लोखंडी सत्तुर घेऊन फिरणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणाला संत तुकारामनगर पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे. मोहसीन समीर सय्यद (वय २५, रा.खराळवाडी, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
२१ मे रोजी संध्याकाळी ६:०० वाजण्याच्या सुमारास हिंदुस्थान अँटीबायोटिक्स (HA) कंपनीच्या मोकळ्या मैदानावर ही कारवाई करण्यात आली. पोलीस शिपाई अक्षय शिवाजी साळुंखे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस सह-आयुक्तांनी शहरात १३ मे ते २६ मे २०२६ या कालावधीत शस्त्रबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश लागू असतानाही आरोपी मोहसीन सय्यद हा कोणत्याही दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने धारदार लोखंडी सत्तुर हातामध्ये बाळगून मैदानात थांबला होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी संशयावरून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे हे घातक हत्यार मिळून आले. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बोकड करत आहेत.













