न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ मे २०२६) :- पिंपरी-चिंचवड शहरात नुकत्याच झालेल्या वादळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळून नुकसान झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर धोकादायक झाडांच्या फांद्या तातडीने कापून काढाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व मुक्त पत्रकार ॲड. सचिन गोडांबे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
दि. २२ मे रोजी झालेल्या वादळी पावसानंतर भोसरी-मोशी परिसरातील दोन ठिकाणी मोठी झाडे रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. तसेच वाल्हेकरवाडीत वाहनांवर झाड पडून नुकसान झाल्याची घटना घडली.
पावसाळा तोंडावर असल्याने महापालिकेच्या वृक्ष विभागाने सार्वजनिक रस्ते, अंतर्गत रस्ते तसेच सोसायट्यांलगत असलेल्या मोठ्या व धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून फांद्या छाटाव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.














