- पावसाळ्यापूर्वी नालेसफाई ३१ मेपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- संभाव्य पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांवरील अतिक्रमणे तात्काळ हटवून नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्ण करा, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले. तसेच अनधिकृत जाहिराती, पोस्टर आणि फलक लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. शहरातील १४१ नाल्यांपैकी ८५.८४ टक्के नालेसफाई पूर्ण झाली असून उर्वरित कामांना गती देण्यात आली आहे. मेट्रो आणि रस्ते विकास कामांमुळे काही अडथळे येत असले तरी ३१ मेपर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुरळीत ठेवण्यासाठी अतिक्रमण हटविणे, कचरा साफ करणे आणि पाणी तुंबणार नाही यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही प्रशासनाने दिले आहेत.














