- ई-वाहने, कारपूलिंग आणि ऑनलाइन कामकाजावर भर; परदेश दौरे स्थगित…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २५ मे २०२६) :- पश्चिम आशियाई संकटाच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा बचत, इंधन वापर नियंत्रण आणि खर्चात कपात करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध उपाययोजना लागू केल्या आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भात सर्व विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे परदेश दौरे पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले असून ई-वाहनांचा वापर, कारपूलिंग आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बैठका, प्रशिक्षण कार्यक्रम आणि आढावा सभा शक्यतो ऑनलाइन घेण्यावर भर देण्यात आला आहे.
कार्यालयांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर, वातानुकूलन यंत्रणेचे तापमान २४ ते २६ अंशांदरम्यान ठेवणे तसेच अनावश्यक विद्युत उपकरणे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पीएनजी वापर वाढविणे आणि खर्चिक जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्याच्याही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.














