- अधिकृत मृतांचा आकडा पंधरा..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १ जुन २०२६) :- पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारू सेवनामुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला आहे. दापोडी आणि हडपसर परिसरातील या धक्कादायक घटनांप्रकरणी दाखल गुन्ह्यांचा तपास आता सीआयडीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.
दापोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता तसेच महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस ठाण्यातही संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशानुसार २९ मे २०२६ रोजी हे दोन्ही गुन्हे सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत.
या प्रकरणात दापोडी परिसरातील आतापर्यंत ११ जणांचा, तर हडपसर परिसरातील ४ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा १५ वर पोहोचला आहे. दापोडी पोलीसांनी सहा आरोपींना अटक केली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी, पुणे करत आहे.















