न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १ जुन २०२६) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘पुण्यश्लोक’ या भव्य महानाट्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे सादर करण्यात आलेल्या या महानाट्यातून अहिल्यादेवींचे दूरदर्शी नेतृत्व, लोककल्याणकारी विचार, धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि प्रजेप्रती असलेली बांधिलकी प्रभावीपणे उलगडण्यात आली.
सुमारे ७५ कलाकारांच्या अभिनयाने, भव्य नेपथ्य, प्रकाशयोजना आणि लोककलांच्या सादरीकरणाने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. मोरवाडी चौकात आयोजित विचार प्रबोधन पर्वात ढोलवादन, शाहिरी आणि विविध लोककलांद्वारे अहिल्यादेवींच्या विचारांचा जागर करण्यात आला.















