न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३ जून २०२६) :- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विद्युत व यांत्रिकी उपविभागामार्फत जलशुद्धीकरण केंद्रातील दुरुस्तीची कामे गुरुवारी (दि. ४) हाती घेण्यात येणार असल्याने दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या कामांचा परिणाम पिंपरी-चिंचवड, भोसरी, देहूरोड, कासारवाडी, निगडी, सीएमई, आर. अँड डी. दिघी, व्हीएसएनएल, कॅन्टोन्मेंट बोर्ड तसेच ओएफडीआर परिसरावर होणार आहे.
तसेच शुक्रवारी (दि. ५) व शनिवारी (दि. ६) संबंधित भागांमध्ये कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे एमआयडीसी प्रशासनाने सांगितले.
नागरिकांनी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून काटकसरीने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.















