न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. 03 जून 2026) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने आकुर्डी परिसरातील मॅजेस्टिक हॉटेलवर बुलडोझर चालवत मोठी कारवाई केली.
महापालिकेच्या परवानगीशिवाय करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत भाग जमीनदोस्त केला. या कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील अनधिकृत बांधकामांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.














