न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ३ जून २०२६) :- यमुनानगर परिसरात पाणीपुरवठा व विद्युत वितरण विभागाच्या भोंगळ कारभारामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांना मात्र मागील तीन दिवसांपासून पाण्याअभावी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पाईपलाईन गळती व विद्युत पुरवठ्यातील अडचणींमुळे परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, एका सामाजिक कार्यकर्त्याने चक्क पाण्यावर बसून अनोखे आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. तातडीने दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.















