न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | दि. ३ जून २०२६ :- पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर कै. भिकू वाघेरे (पाटील) यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त रविवार, ६ जून रोजी नवमहाराष्ट्र मैदान, पिंपरी वाघेरे येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कै. भिकू वाघेरे प्रतिष्ठान आणि ग्रामस्थ पिंपरी वाघेरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमात रक्तदान शिबिर, स्मृतिदिन अभिवादन तसेच “पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार” वितरण सोहळा पार पडणार असून यंदाचा पुरस्कार ॲड. एस. बी. चांडक यांना जाहीर करण्यात आला आहे.
महापौर रवि लांडगे, विविध आमदार, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केले आहे.















