- आमदार अमित गोरखे यांच्या पाठपुराव्याला यश..
- ९ हजार कर्मचाऱ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये..
- प्रशासनाकडून २० कोटींचा निधी मंजूर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे | दि. ३ जून २०२६ :- पीएमपीएमएलमधील सुमारे ९ हजार कर्मचाऱ्यांचा प्रलंबित दिवाळी सानुग्रह अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला २५ हजार रुपये देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
भारतीय जनता पार्टीचे आमदार अमित गोरखे यांनी या प्रश्नासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. दिवाळी उलटून अनेक महिने झाले तरी बोनस व सानुग्रह अनुदान न मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. विविध कामगार संघटनांनी याबाबत आमदार गोरखे यांच्याकडे मागणी केली होती.
यानंतर त्यांनी पीएमपीएमएल प्रशासन व संचालक मंडळाकडे वारंवार पाठपुरावा करून कामगारांची बाजू मांडली. त्यांच्या प्रयत्नांनंतर अखेर प्रशासनाने निधी मंजूर केला.
कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे आमदार अमित गोरखे यांनी सांगितले. दरम्यान, थेट बँक खात्यात अनुदान जमा होण्यास सुरुवात झाल्याने कामगार वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.














