न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी वाटचालीनिमित्त आणि जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले.
भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नेतृत्वाखाली “मोदी सरकारची १२ वर्षे – विश्वास, विकास व जनकल्याण” अभियानांतर्गत इंद्रायणीनगर-नेहरूनगर, मोशी-चऱ्होली, दिघी-गवळीनगर-गव्हाणेवस्ती आणि चिखली-कृष्णानगर मंडलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महापौर रवि लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, सरचिटणीस विकास डोळस, मंडलाध्यक्ष प्रमोद परदेशी, शिवराज लांडगे, अजय साने, अजित बुर्डे तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. तसेच आगामी काळात जनसंपर्क अभियान, जनकल्याण शिबिरे, नैसर्गिक शेती कार्यशाळा आणि जागतिक योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी यांनी दिली.















