- महिनाभरात ५ हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. ०५ जून २०२६) :- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. शहरातील सुमारे ४० ठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी भाजयुमोचे शहराध्यक्ष दिनेश लालचंद यादव यांनी पुढील महिनाभरात ५ हजार वृक्ष लागवडीचा संकल्प जाहीर केला.
वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि कमी होत चाललेले हरित क्षेत्र लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला. विविध सार्वजनिक ठिकाणे, शैक्षणिक परिसर आणि मोकळ्या जागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी पर्यावरण संरक्षण, जलसंधारण आणि प्लास्टिकमुक्त जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमात भाजयुमोचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बाप्पू काटे, संकेत चोंधे, दिनेश काटे, प्रसाद कस्पटे, सुमित घाटे, राजेश डोंगरे, दीपक नागरगोजे, दयानंद बडंगर, नितीन साळी, रोहित कराळे, जालिंदर काटे, आकाश पवार, ओमकार मानकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.















