न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. १२ जून २०२६) :- चिखलीतील शेलारवस्ती परिसरात जमिनीच्या वादातून एका बांधकाम व्यावसायिकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तिघांविरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 23 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी अतुरसिंग दयालसिंग चंदानी (वय 55, व्यवसाय- कन्स्ट्रक्शन) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुशिल गुप्ता, अनिल गुलाब शेलार आणि युवराज शेलार (रा. शेलारवस्ती, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कार्यालय बंद करून घरी जात असताना जागेच्या मालकीवरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादीला दमदाटी केली. अनिल शेलार याने मारहाण केली, तर युवराज शेलार याने सिमेंटचा गड्डा तोंडावर मारल्याने फिर्यादीचा दात पडला व दुखापत झाली. तसेच आरोपींनी कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव व पोलीस उपनिरीक्षक देवकुळे करीत आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.















