- न्यायाधीश, वकील आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण न्यायालयाची झाडाझडती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ५ नोव्हेंबर २०२६) :- पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून गुरुवारी (दि. ५) विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने प्रशिक्षित श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयाची इमारत, प्रवेशद्वार, विविध विभाग आणि संपूर्ण परिसराची कसून तपासणी केली. संभाव्य धोका आणि संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
न्यायालयाच्या आवारात दररोज न्यायाधीश, वकील, पक्षकार, नागरिक आणि कर्मचारी मोठ्या संख्येने येत असतात. त्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत पोलिसांनी ही विशेष तपासणी केली. यावेळी श्वानपथकाच्या मदतीने न्यायालयातील विविध ठिकाणांची पाहणी करून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला.
या तपासणीवेळी पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. योगेश थंबा (कव्हेकर), महिला सचिव रीना मगदूम, माजी महिला सचिव ॲड. कांता गोर्डे, माजी अध्यक्ष ॲड. किरण पवार, माजी खजिनदार ॲड. संदीप तापकिर उपस्थित होते. तसेच बॉम्बशोधक पथकाचे अधिकारी अनंत चव्हाण, प्रवीण ढोरजे, अनिल साळुंखे यांच्यासह न्यायालयातील अनेक वकील उपस्थित होते.














![[ब्रेकिंग न्यूज] लाचखोरीच्या आरोपानंतर मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे निलंबित!...](https://newspcmc.com/wp-content/uploads/2026/11/Screenshot_20261104_200149_Google-190x122.jpg)


