- पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचा ऑनलाइन उपक्रम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ११ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने ‘ट्राफिक बडी’ या ऑनलाइन व्हॉट्सअॅप चॅटबॉटद्वारे जून २०२६ या एका महिन्यात नागरिकांच्या १ हजार ६३८ वाहतूकविषयक तक्रारींचे निराकरण केले.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार, पोलीस सहआयुक्त शशिकांत महावरकर आणि अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी, वाहतूक नियमन तसेच अन्य वाहतूकविषयक समस्या तत्काळ मांडण्यासाठी नागरिकांना या सुविधेचा उपयोग करता येतो.
नागरिकांनी वाहतूकविषयक तक्रारींच्या निराकरणासाठी ‘ट्राफिक बडी’ व्हॉट्सअॅप चॅटबॉट क्रमांक ८७८८६४९८८५ याचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त (वाहतूक) विक्रांत देशमुख यांनी केले आहे.

















