- लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने महापूजा व महाआरतीचा सोहळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जुलै २०२६) :- जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विश्वगुरू सन्मानित ह.भ.प. नामदेव महाराज हरड यांना संत तुकाराम महाराजांच्या पादुका पूजनाचा मान देण्यात आला.
लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत महापूजा व महाआरती पार पडली. यावेळी ह.भ.प. मयुरानंद महाराज, ह.भ.प. समृद्धी भांडे, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज मोरे आणि ह.भ.प. माणिक महाराज मोरे उपस्थित होते.
आगामी २०२७ सिंहस्थ कुंभमेळ्यात १०८ संतांचे महापूजन तसेच भाविकांसाठी महाप्रसाद व निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

















