- अॅटोनी लारा कंपनीचा प्रकल्प प्रमुख, सेफ्टी अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा..
- नऊ जणांच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसात गुन्हा दाखल..
- सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष केल्याचा फिर्यादीत आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी | १४ जुलै २०२६ :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी लारा रिन्युएबल एनर्जी प्रा. लि.चे प्रकल्प प्रमुख अशोककुमार गुप्ता आणि सेफ्टी अधिकारी विजय सपकाळ यांच्याविरुद्ध एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेचे सोहन निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५, १२५ (ए), १२५ (बी) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
पावसाळ्यात एसएलएफची तपासणी करून संभाव्य धोके टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करणे कंपनीची जबाबदारी होती. उपाययोजना न केल्यास जीवितहानी होऊ शकते, याची माहिती असतानाही आवश्यक खबरदारी घेण्यात आली नसल्याचा आरोप फिर्यादीत आहे.
८ जुलै रोजी एसएलएफचा काही भाग इमारत आणि रस्त्यावर ढासळून नऊ जणांचा मृत्यू झाला, तर बारा जण जखमी झाले. या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
















