- १५ ते ३१ जुलैदरम्यान अर्ज प्रक्रिया…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात घर ते शाळा आणि शाळा ते घर बसपास योजना राबविण्यास महापालिका सभेने मान्यता दिली आहे.
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना पूर्णपणे मोफत, तर शासनमान्य खासगी शाळांतील विद्यार्थ्यांना बसपासच्या २५ टक्के रक्कम भरून या योजनेचा लाभ मिळणार आहे.
योजनेसाठी मागील शैक्षणिक वर्षात किमान ७५ टक्के उपस्थिती आणि घरापासून शाळेचे अंतर दोन किलोमीटरपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे. अर्जासोबत रहिवासी पुरावा, ओळखपत्र, शाळेचे प्रमाणपत्र आणि दोन फोटो जोडावे लागतील. अर्ज प्रक्रिया १५ ते ३१ जुलैदरम्यान होणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.

















