- मुख्य अभियंता आणि कार्यकारी अभियंता निलंबित..
- निष्काळजीपणाचा ठपका; दोघांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठी प्रशासकीय कारवाई करत मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता (पर्यावरण) योगेश सोपान आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने सेवानिलंबित केले आहे. दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यासही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मंजुरी दिली आहे.
मोशी कचरा डेपो येथे कचऱ्याचा ढिगारा कोसळून आरसीसी इमारत जमीनदोस्त झाल्याने नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत कामकाजातील निष्काळजीपणा, पर्यवेक्षणातील त्रुटी, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन, अनधिकृत बांधकामास दिलेले प्रशासकीय अभय आणि सार्वजनिक सुरक्षेबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात कसूर केल्याचा ठपका दोन्ही अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.
निलंबन काळात त्यांना नियमानुसार उपजीविका भत्ता मिळणार असून, परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. संबंधित विभागाला १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

















