- अतिक्रमण कारवाईची माहिती आधीच फुटत असल्याचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड ( दि. १५ जुलै २०२६) :- महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपच्या नगरसेविका अनुराधा गोरखे यांनी शहरातील बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्या आणि प्लास्टिक बाटल्यांच्या विक्रीचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनावर तीव्र टीका केली. प्लास्टिकबंदीची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने शहरात सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
गोरखे म्हणाल्या, चिकन विक्रेते, भाजीपाला विक्रेते आणि इतर व्यावसायिकांकडे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या नेमक्या कुठून येतात, याचा शोध घेऊन पुरवठा साखळीवरच कारवाई करावी. केवळ किरकोळ विक्रेत्यांवर कारवाई करून प्रश्न सुटणार नाही, तर बेकायदेशीर पुरवठादारांवर बंदी घालणे आवश्यक आहे.
अतिक्रमण हटाव कारवाईची माहिती संबंधितांना आधीच दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे कारवाई प्रभावी ठरत नसल्याचे सांगत प्रशासनाने माहिती गळती रोखून मूळावर घाव घालणारी कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.

















