न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १७ जुलै २०२६) :- कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणेच्या पिंपरी उपबाजार विभाग प्रमुखपदी आशिष जयप्रकाश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. राऊत यांनी यापूर्वी भाजीपाला गटप्रमुख आणि केळी बाजार विभाग प्रमुख म्हणून काम करत प्रशासकीय अनुभव मिळवला आहे.
पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना राऊत यांनी पिंपरी फुलबाजाराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक चांगला भाव मिळावा, तसेच मावळ, मुळशी, खेड, राजगुरूनगर आणि मंचर येथून येणाऱ्या शेतकऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
रेल्वे, मेट्रो आणि बससारख्या वाहतूक सुविधांमुळे पिंपरी फुलबाजार आधुनिक व अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. तसेच शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही राऊत यांनी सांगितले.

















