न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १९ जुलै २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलिसांनी घातक शस्त्रे बाळगण्यास बंदी असतानाही विनापरवाना लोखंडी कोयता जवळ बाळगणाऱ्या दोघांविरुद्ध स्वतंत्र कारवाई केली आहे. आळंदी आणि काळेवाडी पोलीस ठाण्यांत शस्त्र अधिनियम व महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
आळंदी परिसरातील शिवण्या बिअर बार अँड रेस्टॉरंटसमोरील मोकळ्या जागेत शिवदास ऊर्फ नितीन राजाभाऊ लवटे (वय २२, रा. चाकण) हा विनापरवाना लोखंडी कोयता जवळ बाळगताना गुन्हे शाखेच्या पथकाला आढळला. त्याच्याकडून सुमारे ५०० रुपये किमतीचा कोयता जप्त करण्यात आला.
दुसऱ्या कारवाईत, थेरगाव स्मशानभूमीजवळ काळेवाडी पोलिसांनी श्रवण विजय माचरे (वय २०, रा. डांगे चौक) याला लोखंडी कोयत्यासह ताब्यात घेतले. पोलिस आयुक्तांनी लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी शस्त्रे जप्त केली असून पुढील तपास संबंधित पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे.

















