- आरोग्य, रक्तदान, शिक्षण, पर्यावरण आणि नागरिक सुविधांवर भर..
- नगरसेविका योगिताताई बारणे यांच्या मानधनातून गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन निधी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जुलै २०२६) :- लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त थेरगाव परिसरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. कैलास (बाबा) बारणे युवा मंच आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नगरसेविका योगिताताई महेश बारणे यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
साईनाथ नगर येथील साई मंदिर परिसरात आयोजित महाआरोग्य शिबिर, महा रक्तदान शिबिर, मोफत नेत्र तपासणी आणि पात्र लाभार्थ्यांना मोफत चष्मे वाटप या उपक्रमांना मोठा प्रतिसाद मिळाला. शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली, तर अनेक युवक आणि नागरिकांनी रक्तदान करत सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली.
याच दिवशी ग प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात नागरिकांसाठी माफक दरात एनसीएमसी (ST Smart Card) नोंदणी शिबिरालाही प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणाऱ्या नागरिकांना डिजिटल सेवा अधिक सुलभ होणार आहे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी थेरगाव परिसरासह सुखावणी पॅसिफिक सोसायटी येथे वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.
यावेळी नगरसेविका योगिताताई महेश बारणे यांनी थेरगाव महापालिका माध्यमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मासिक मानधनातून प्रोत्साहन निधी योजना सुरू करण्याची घोषणा केली. आर्थिकदृष्ट्या गरजू आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी विरोधी पक्षनेते व नगरसेवक विठ्ठल (नाना) काटे, माजी नगरसेवक कैलास (बाबा) बारणे, नगरसेविका योगिताताई महेश बारणे, मालिकाताई साकळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचवड विधानसभा उपाध्यक्ष प्रविण (नाना) बारणे, उद्योजक महेश सुदाम बारणे, युवा नेते सागर बारणे, निखिल साकळे, विठ्ठल (आप्पा) पवार, चांगदेव पवार, दिलीप पवार, गणेश पवार आणि बाळकृष्ण पाडाळे उपस्थित होते.
महिला कार्यकर्त्यांमध्ये काजल प्रवीण बारणे, संगीता पवार, रुक्मिणी जाधव, लता बारणे, अस्मिता पवार, निलम बारणे, कोमल कोळेकर, कल्याणी पवार, कविता बारणे आणि साकळे यांनी सहभाग नोंदविला.
तसेच युवा कार्यकर्त्यांमध्ये अक्षय बारणे, प्रशांत बारणे, सोमनाथ खेंगरे, तुषार मोरे, संदेश निवडुंगे, योगेश मोरे, संतोष भांगे, प्रतीक बारणे, सोहम बारणे, सौरभ पाडाळे, ओम पाडाळे, प्रणव गुरव, स्वप्नील शिंदे, गणेश नढे, किशोर कदम, राज कोकरे, कृष्णा काजळे, मोनू गुप्ता, अविनाश सुतार, योगेश जोगदंड, आशिष जगताप, आशिष पवार, सागर नाणेकर, विशाल गायकवाड आणि विशाल माने यांनी विविध उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय योगदान दिले.
उपस्थित मान्यवरांनी स्व. अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख कार्याचा गौरव करत, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समाजहिताचे उपक्रम राबविणे हीच खरी आदरांजली असल्याची भावना व्यक्त केली. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि नागरिक सुविधा या चारही क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या या उपक्रमांमुळे थेरगाव परिसरात सामाजिक बांधिलकीचा प्रभावी संदेश पोहोचल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.

















