- भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या पाठपुराव्याला यश..
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती लेखी मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जुलै २०२६) :- नाशिक फाटा ते खेड ट्विन एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पासाठी पीएमआरडीए हद्दीतील ४.१०४ हेक्टर जमिनीच्या भूसंपादनासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (MSRDC) निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे रखडलेल्या भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे.
या प्रकल्पासाठी एकूण १४.१ हेक्टर अतिरिक्त भूसंपादन आवश्यक असून, त्यासाठी NHAI ने ६०० कोटी रुपयांचे मूल्यांकन केले आहे. यापैकी पीएमआरडीएच्या वाट्याचा निधी उपलब्ध करण्यासाठी २० जुलै २०२६ रोजी शासनाने आदेश जारी केला.
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी यासाठी राज्य विधिमंडळात लक्षवेधी सूचना मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्यानंतर हा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले. या निधीमुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला वेग मिळून नाशिक फाटा, भोसरी, मोशी, चऱ्होली तसेच पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.

















