न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २३ जुलै २०२६) :- मागील 5 वर्षापासून चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेतर्फे वार्षिक कुटुंब संमेलन आयोजित करण्यात येते. यंदाच्या संमेलनामध्ये उद्योजक संघटनेने महिला ऊद्योजिकांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. उद्योग व्यवसायात महिलांचे देखील मोठे श्रम व त्याग असतो हा त्यामागचा उद्देश लक्षात ठेवून मार्गदर्शन करण्यात आले. त्याचबरोबर उद्योजक संघटनेच्या उद्योजकांच्या दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
चिंचवडमध्ये हे स्नेह संमेलन पार पडले या कुटुंब संमेलनामध्ये शेकडो उद्योजक आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत सहभागी झाले होते. चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी संपूर्ण संघटनेच्या कार्याचा व नंतर उद्योजिका संघटना प्रमुख पौर्णिमा शिंदे यांनी गेल्या 4 वर्षांमध्ये उद्योजिका ग्रुपने राबविलेल्या सामाजिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचा आढावा घेतला.
पी एस कंट्रोल ॲंड स्विचगिअरच्या संचालिका सौ शिल्पा अनिल पवार व युवाशक्ती स्कील इंडीया फाऊंडेशनच्या संचालिका सौ ऐश्वर्या निखिल शिंदे यांना उत्कृष्ट महिला ऊद्योजिका 2026 या पुरस्काराने सन्मानित केले गेले.
या दोन्हीही ऊद्योजिकेंचे मनोगत निवेदक महेंद्र एरंडे यांच्याकडुन वेगवेगळे प्रश्न विचारून उलगडण्यात आले.
या कार्यक्रमासाठी चाकण MIDC उद्योजक संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व संचालक प्रवीण शिंदे यांनी मोलाचा वाटा उचलला. चाकण भोसरी MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी शेवटी आभार मानले.

















