- त्वरित दुरुस्ती करा; सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. २७ ऑगस्ट २०२६) :- रहाटणी येथील छत्रपती श्री शिवाजी चौकात रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
चौकातील वर्दळीच्या ठिकाणीच हा खड्डा पडल्यामुळे वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डा स्पष्ट दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. दुचाकीस्वारांना खड्डा चुकविताना अचानक ब्रेक लावावे लागत असल्याने परिस्थिती अधिक धोकादायक बनली आहे.
संबंधित प्रशासनाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन खड्ड्याची पाहणी करावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अरुण चाबुकस्वार यांनी केली आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत प्रशासनाने विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

















