न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. २८ ऑगस्ट २०२६) :- दुसऱ्या पुणे जिल्हास्तरीय जू-जुस्तू स्पर्धेत मरकळ येथील फ्लाइंग बर्ड्स इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत सेमी-काँटॅक्ट प्रकारात वय वर्षे ६ ते ११ या गटात द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप पटकावली. या स्पर्धेत शाळेच्या १७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत तब्बल ४ सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांची कमाई केली.
पदक विजेत्यांमध्ये गणेश जाधव (रौप्य), जिजाई गायकवाड (सुवर्ण), स्वानंदी गायकवाड (कांस्य), शिवांश बनसोडे (रौप्य), समर्थ कानडे (कांस्य), प्रेया सरोदे (कांस्य), प्रतीक इंगळे (कांस्य), रियांश भाडळे (रौप्य), अर्णव बुणगे (कांस्य), शौर्य कोळेकर (कांस्य), अवधूत गंगावणे (कांस्य), गार्गी दळवी (कांस्य), वैदेही बोबडे (सुवर्ण), शर्वरी कोळेकर (सुवर्ण), स्पंदन गायकवाड (सुवर्ण), सर्वेश घेणंद (कांस्य) आणि ऋग्वेद भिसे (रौप्य) यांचा समावेश आहे.
या यशाबद्दल सरस्वती भवन शिक्षण संस्थेचे संस्थापक संभाजीराव सुभाष शिरसाट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या सुप्रिया दिनेश कवडे यांचे मार्गदर्शन आणि शारीरिक शिक्षण शिक्षिका दिपाली पाटील यांच्या अथक परिश्रमामुळे हे यश मिळाले. विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


















