- उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार व चिखली पोलिसांकडे नागरिकांच्या त्रासाबाबत निवेदन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २९ ऑगस्ट २०२६) :- प्रभाग क्रमांक ११ कृष्णानगर येथील ‘कोमल वाईन्स’ परिसरात मद्यविक्रीमुळे नागरिकांना होणारा त्रास, सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी व वाहतुकीला निर्माण होणाऱ्या अडथळ्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच चिखली पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे लेखी निवेदन दिले.
कोमल वाईन्स परिसरात दररोज मोठी गर्दी होत असून महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी व लहान मुलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कृष्णानगर, कोयना नगर, शरद नगर, घरकुल, महात्मा फुले नगर व शिवाजी पार्क परिसरात नागरिकांची मोठी वस्ती असल्याने प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी कर्मयोगी संत गाडगेबाबा जागृती मंच, महात्मा फुले नगरचे अध्यक्ष यशवंत कन्हेरे काका, कोयना नगर कृती समितीचे उपाध्यक्ष रामचंद्र गुरव तसेच इंगवले काका उपस्थित होते. परिसराची पाहणी, नियमभंग आढळल्यास कारवाई आणि पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी मारुती गणपत जाधव यांनी केली.

















