- सचिन अहिर यांच्या हस्ते उद्घाटन; १२५ कंपन्यांकडून मुलाखती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑगस्ट २०२६) :- पिंपरी-चिंचवड शिवसेनेच्या वतीने खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्याला ७,५०० हून अधिक युवक-युवतींनी उपस्थिती लावली. विधान परिषद उपसभापती सचिन अहिर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन व निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. दिव्यांग उमेदवाराला महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी खा. श्रीरंग बारणे, सुलभा उबाळे, विश्वजीत बारणे, प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे, निलेश तरस, ऐश्वर्या तरस, रेश्मा कातळे, निलेश बारणे, नारायण बहिरवाडे, राजेश फल्ले, सागर पाचरणे, बाळासाहेब वाल्हेकर, राजेश खांडभोर, खंडूशेठ चिंचवडे, शैला भोंडवे, सरिता साने व सायली साळवे उपस्थित होते.
१२५ कंपन्यांनी मुलाखती घेतल्या. ५,५०० जणांनी ऑनलाइन तर २,५७० जणांनी प्रत्यक्ष नोंदणी केली. सर्व सहभागी उमेदवारांना रोजगार मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार बारणे यांनी दिली. उबाळे यांनी नोकरी न मिळालेल्यांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’द्वारे सहा महिने मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले.


















