- पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते श्रेया घोषाल यांना २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ३० ऑगस्ट २०२६) :- संघर्ष आणि साधना म्हणजे आशाताई भोसले. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचे आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका श्रेया घोषाल यांनी सांगितले. प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात ज्येष्ठ संगीतकार पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना २१ वा ‘आशा भोसले पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप १ लाख ११ हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पैठणी असे होते.
यावेळी भाऊसाहेब भोईर, आमदार अमित गोरखे, योगेश बहल, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कृष्णकुमार गोयल, गौरव घुले, मानसी भोईर-घुले, वंदना घांगूर्डे, रुणाल सांकला, दिलीप काटकर, हर्षवर्धन भोईर, किरण येवलेकर, राजू बंग, गौरी लोंढे उपस्थित होते. भोईर यांच्या निमंत्रणावरून लवकरच पिंपरी-चिंचवडसाठी सांगीतिक कार्यक्रम करणार असल्याचे श्रेया यांनी जाहीर केले.
सोहळ्यात ‘आशा से श्रेया तक’ कार्यक्रम झाला. यापूर्वी लता मंगेशकर, खय्याम, रवींद्र जैन, बप्पी लहरी, प्यारेलाल, आनंदजी, उषा मंगेशकर, अनु मलिक, शंकर महादेवन, शिवकुमार शर्मा, सुरेश वाडकर, हरीहरन, सोनू निगम, सुनिधी चौहान, उदित नारायण, रूपकुमार राठोड, अवधूत गुप्ते, सलील कुलकर्णी आणि शान यांना हा पुरस्कार मिळाला आहे.


















