न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. ३१ ऑगस्ट २०२६) :- फुगेवाडी-दापोडी परिसरातील महिला आघाडी, युवा सेना व शिवसेनेच्या वतीने दापोडी पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. महिला पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना राखी बांधून शुभेच्छा दिल्या.
यावेळी सचिन निकम (API), नवनाथ पवळे (PSI), मनोज जासूद (PSI) व सागर शेडगे (HC) उपस्थित होते. कोमल ताई जाधव, जयश्री वायकर, कोमल वायकर, रेश्मा गायकवाड, भाग्यश्री बगाडे, उषा सपकाळ, कैलास जाधव, फिरोज शेख, योगेश बहिरट, दीपक सपकाळ, दीपक बगाडे व विनोद शिंदे यांनी सहभाग घेतला.
समाजाच्या सुरक्षिततेसाठी कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी युवा सेना शहर संघटक निलेश हाके व प्रमोद गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.


















