न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने गणेशोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा ‘श्री मोरया पुरस्कार २०२५’ने गौरव करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार, दि. २ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात होणार आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या संकल्पनेतून मागील चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था राखत, शासकीय नियमांचे काटेकोर पालन करून सामाजिक प्रबोधनपर उपक्रम राबविणाऱ्या मंडळांना प्रोत्साहन देणे हा पुरस्काराचा उद्देश आहे.
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.


















