- महापौर रवि लांडगे यांच्याकडून अभिनंदन..!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०१ सप्टेंबर २०२६) :- चिंचवड येथील अवघ्या नऊ वर्षांच्या बुद्धिबळपटू अन्वी दिपक हिंगे हिने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत शहराचे नाव उज्ज्वल केले आहे. अन्वीने Woman Candidate Master (WCM) किताब मिळवला असून FIDE Girls U-9 रेटिंगमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावण्याचा बहुमान मिळवला आहे.
World Cadet & Youth Rapid Chess Championship (Girls U-8) मध्ये उपविजेतेपद मिळवणाऱ्या अन्वीने आतापर्यंत १३ आंतरराष्ट्रीय पदके पटकावली आहेत. ग्रीस, ताजिकिस्तान, मलेशिया व थायलंडमध्ये तिने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. महाराष्ट्र U-9 मुलींच्या अजिंक्यपद स्पर्धेतही तिने विजेतेपद मिळवले.
अन्वी Elpro International Schoolमध्ये शिक्षण घेत असून ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे व फिडे मास्टर सिद्धांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तिचा गौरव झाला आहे.
महापौर रवि लांडगे यांनी अन्वीचे अभिनंदन करून तिच्या विश्वविजेतेपदाच्या स्वप्नासाठी शुभेच्छा दिल्या.


















