- मुख्यमंत्री फडणवीसांचे संकेत; आयटी पार्कसह परिसराच्या नियोजनबद्ध विकासाला गती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- हिंजवडी आयटी पार्कमधील कंपन्यांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासह परिसरातील नागरी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी हिंजवडीसह लगतच्या गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत समावेश करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हिंजवडी परिसरातील वाढती लोकसंख्या, वाहतूक कोंडी, रस्ते, पाणी, ड्रेनेज आणि अन्य नागरी सुविधांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आयटी पार्कमुळे या परिसराचे महत्त्व वाढले असतानाही अपेक्षित नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिक तसेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर हिंजवडीसह परिसरातील गावांचा महापालिका हद्दीत समावेश झाल्यास नियोजनबद्ध विकासाला चालना मिळून परिसराचा कायापालट करण्यावर भर दिला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे हिंजवडीच्या महापालिका समावेशाचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता असून, आगामी निर्णयाकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

















