- नवीन डंपिंगसाठी जागा नसल्याचा आयुक्तांचा पुनरुच्चार…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाची दुरुस्ती करून तो सप्टेंबरअखेरीस पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिका सभेत दिली. प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज सुमारे एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल आणि शहरातील कचरा व्यवस्थापनावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेपूर्वीच प्रकल्पाची चिमणी कोसळल्याने कामकाजात अडथळे आले होते. सध्या चिमणीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. दरम्यान, मोशीतील पहिल्या टप्प्यातील बायोमायनिंग अंतिम टप्प्यात असून, उर्वरित कचऱ्यासाठी नवीन निविदा काढण्यात येणार आहे. विद्यमान ठेकेदारांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्रांसाठी जागांचा शोध सुरू आहे. तसेच, काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची विभागीय चौकशी सुरू असून, शहरातील एसटीपीचेही ऑडिट करण्यात येणार आहे.


















