- ५ सप्टेंबरला सायंकाळी ते रात्री १० पर्यंत विविध मार्ग बंद..
- चाकण, रावेतसह शहरातील प्रमुख मार्गांवर निर्बंध..
- नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शहरातील विविध मार्गांवर तात्पुरते वाहतूक बदल लागू केले आहेत. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता आवश्यकतेनुसार सर्व प्रकारच्या वाहनांना काही मार्गांवर प्रवेशबंदी राहणार आहे.
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड विक्रांत देशमुख यांनी याबाबत वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे. उत्सवाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.
दिघी-आळंदी वाहतूक विभाग
चऱ्होली फाटा येथून मरकळ/शिक्रापूरकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग १ : चऱ्होली फाटा येथून मॅजिक मिठाई स्वीट होमकडे डावीकडे वळून तनिष ऑर्चिड फेज-२ सोसायटी, ग्लोबल हाईट्स सोसायटी, अपेक्स इंटरनॅशनल स्कूल, रिव्हर नेस्ट सोसायटीसमोरून डावीकडे वळून पुलावरून पीसीएस चौक (धानोरे फाटा) मार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
पर्यायी मार्ग २ : शिक्रापूर नगरमार्गे येणारी वाहतूक पीसीएस चौक (धानोरे फाटा), दाभाडे वस्ती येथून उजवीकडे वळून रिव्हर नेस्ट सोसायटी, अपेक्स इंटरनॅशनल स्कूल, ग्लोबल हाईट्स सोसायटी, तनिष ऑर्चिड फेज-२ सोसायटीमार्गे मॅजिक मिठाई स्वीट होम, चऱ्होली फाटा येथे येऊन पुढे इच्छितस्थळी जाईल.
सांगवी वाहतूक विभाग
काटेपुरम चौकाकडून कृष्णा चौकाकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग : काटेपुरम चौकातून उजवीकडे वळून गजानननगर मार्गे बारा घोलपकडे जाता येईल. तसेच कृष्णा चौकातून डावीकडे वळून नर्मदा गार्डन चौक, माहेश्वरी चौक मार्गे माकप (संविधान चौक) आणि पुढे इच्छितस्थळी जाता येईल.
साई चौकाकडून कृष्णा चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहील.
पर्यायी मार्ग : साई चौकातून डावीकडे वळून फेमस चौक, क्रांती चौक, कांक्रिया गॅस एजन्सी, डायनोसर गार्डन, पिंपळे गुरवमार्गे इच्छितस्थळी जाता येईल. तसेच साई चौकातून उजवीकडे वळून माहेश्वरी चौक, नर्मदा गार्डन, काटेपुरम चौक, भैरवनाथ कमान, पिंपळे गुरवमार्गे पुढे जाता येईल.
पिंपरी वाहतूक विभाग
जमतानी चौकातून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग १ : डिलक्स चौक व काळेवाडी पुलाकडून येणारी वाहतूक जमतानी चौकातून डावीकडे वळून गेलार्ड चौकमार्गे इच्छितस्थळी जाईल.
पर्यायी मार्ग २ : साई चौक व डिलक्स चौकाकडून येणारी वाहतूक उजवीकडे वळून काळेवाडी/पवनेश्वर मंदिर मार्गे पुढे जाईल.
नवमहाराष्ट्र चौकाकडून पिंपरी गावाकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग : नवमहाराष्ट्र चौकाकडून येणारी वाहतूक जाधव वडेवाले हॉटेलपासून डावीकडे वळून रहाटणी पुलामार्गे इच्छितस्थळी जाईल. रहाटणी पुलाकडून येणारी वाहतूक जाधव वडेवाले चौकातून नवमहाराष्ट्र चौकमार्गे पुढे जाईल.
भोसरी वाहतूक विभाग
पुणे-नाशिक महामार्गावरील बाबर पेट्रोल पंप चौकाकडून जायका चहा दुकानाजवळून भोसरी ओव्हरब्रिजखाली जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना, दुचाकी वगळता, प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : ही वाहने भोसरी ओव्हरब्रिजमार्गे पुढे धावडे वस्तीकडे जाऊन सद्गुरूनगर चौकातून यू-टर्न घेऊन भोसरी ब्रिजखाली येत दिघी-आळंदीकडे इच्छितस्थळी जातील.
फुगेवाडी-दापोडी ओव्हरब्रिजमार्गे शितळादेवी चौकातून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे व तेथून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग १ : शितळादेवी चौकातून उजवीकडे वळून सांगवीमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
पर्यायी मार्ग २ : फुगेवाडी चौकातून हॅरिस ब्रिज अंडरपासमार्गे बोपोडीच्या दिशेने जाता येईल.
चिखली वाहतूक विभाग
कृष्णानगर भाजी मंडई चौकातून साने चौकाकडे जाण्यास सर्व वाहनांना मनाई राहील.
पर्यायी मार्ग : कृष्णानगर भाजी मंडई चौकातून कोहिनूर फॅशन दुकानाजवळून डावीकडे वळून प्रथमेश पार्क सोसायटी, साई मंदिरमार्गे साने चौकात येऊन नेवाळेवस्ती कॉर्नरमार्गे पुढे जाता येईल.
नेवाळेवस्ती कॉर्नर चौकातून साने चौकाकडे जाणारी वाहतूकही बंद राहील. या वाहनांनी साने चौकातून उजवीकडे, साई मंदिरमार्गे प्रथमेश पार्क सोसायटी, कोहिनूर फॅशन दुकान, कृष्णानगर भाजी मंडई चौकमार्गे इच्छितस्थळी जावे.
मोशी चौकातून तसेच वाय-पॉईंट कुदळेवस्ती येथून अनुष्का सोसायटीकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहणार आहे. पर्यायी मार्ग : भारतमाता चौकातून इच्छितस्थळी जाता येईल.
वाकड वाहतूक विभाग
काळाखडक चौकाकडून फिनिक्स मॉलकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद राहील.
पर्यायी मार्ग : काळाखडक चौकातून पुढे भुमकर चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
जॅग्वार शोरूम व बालवडकर पेट्रोल पंपाकडून फिनिक्स मॉलकडे येणारी वाहतूकही बंद राहणार आहे.
पर्यायी मार्ग : ही वाहतूक सर्व्हिस रोडने सयाजी अंडरपासकडे तसेच मॉलच्या पाठीमागील रस्त्याने इच्छितस्थळी वळविण्यात येईल.
देहूरोड वाहतूक विभाग
परंडवाळ चौकातून मुख्य कमान महाद्वाराकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग : काळोखे पाटील चौक-साईराज चौकमार्गे इच्छितस्थळी जाता येईल.
साईराज चौकातून १४ टाळकरी कमानीकडे जाणारी वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग : भैरवनाथ चौक-काळोखे पाटील चौक-परंडवाळ चौकमार्गे पुढे जाता येईल.
भैरवनाथ चौकातून १४ टाळकरी कमानीकडे जाणाऱ्या वाहनांनाही प्रवेश बंद राहील. पर्यायी मार्ग : काळोखे पाटील चौक-परंडवाळ चौक.
तसेच काळोखे पाटील चौकातून मुख्य कमान महाद्वाराकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.


















