- लिपिक कर्मचारी रंगेहात पकडल्याची माहिती…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. ०३ सप्टेंबर २०२६) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी विभागीय कार्यालयातील करसंकलन विभागात अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) पथकाने धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत करसंकलन विभागातील लिपिक कर्मचारी उमेश कुटे यांना रंगेहात पकडण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. नेमकी किती रकमेची लाच स्वीकारण्यात आली आणि ती कोणत्या कामासाठी मागण्यात आली होती, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणी सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एसीबीकडून पुढील तपास सुरू असून अधिकृत माहिती आल्यानंतर प्रकरणातील तपशील स्पष्ट होणार आहे…

















