- धडामधुमच्या आवाजाने परिसर हादरला..
- महापारेषण केंद्रातून धुराचे प्रचंड लोट, वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव | ६ सप्टेंबर २०२६ :- चिंचवडगावातील बिजलीनगर येथील महापारेषण केंद्रात आज रविवारी मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.
स्फोटानंतर महापारेषण केंद्र परिसरातून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना दिसून आले. घटनेच्या वेळी झालेल्या मोठ्या आवाजाने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेमुळे शहरातील वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक भागांमध्ये बत्तीगुल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोट नेमका कोणत्या उपकरणात झाला आणि त्यामागचे कारण काय, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनास्थळी महापारेषणचे अधिकारी व तांत्रिक कर्मचारी दाखल होऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
महापारेषणचे बिजलीनगर कार्यालय हे शहरातील वीज यंत्रणेतील महत्त्वाचे केंद्र आहे. स्फोटाचे नेमके कारण, नुकसान आणि वीजपुरवठा कधी सुरळीत होणार याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.

















