- रोजगारनिर्मितीला मिळणार चालना…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. १६ ऑक्टोबर २०२६) :- सिल्वर राईज इंडस्ट्रियल पार्कचा उद्घाटन सोहळा खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब महाराज काशीद आणि आमदार महेश लांडगे यांचे बंधू कार्तिक लांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सिल्वर राईज ग्रुपचे डायरेक्टर संतोष बारणे म्हणाले, “सिल्वर राईज इंडस्ट्रियल पार्कच्या माध्यमातून औद्योगिक विकासाला चालना देण्यासोबतच स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. देशी आणि विदेशी कंपन्यांना उद्योगविस्तारासाठी या पार्कच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध होणार अधिकाधिक उद्योगांना या पार्कशी जोडण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उद्योगांची भरभराट झाली, तर परिसराच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल. रोजगारनिर्मिती आणि सामाजिक बांधिलकी जपत सिल्वर राईज ग्रुप भविष्यातही विकासासाठी कार्यरत राहील.”
उद्घाटन सोहळ्याला विविध मान्यवर, उद्योजक आणि सहकारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपस्थित मान्यवरांचे आणि सहकाऱ्यांचे सिल्वर राईज ग्रुपच्या वतीने आभार मानण्यात आले.


















