न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. १७ ऑक्टोबर २०२६) :- भोसरी येथील संतोष अण्णा गव्हाणे स्पोर्टस् क्लबच्या वतीने महिलांसाठी भव्य गरबा व दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवाला महिला व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मंडळाचे अध्यक्ष निरंजन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्ती आई जगदंबेच्या भक्तीचा, शक्तीचा आणि भारतीय संस्कृतीचा मंगलमय सोहळा. महिलांना एकत्र आणून धार्मिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सभापती राणीमाई अशोक पठारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
दरम्यान, दसऱ्याच्या दिवशी आयोजित बक्षीस वितरण समारंभाला आमदार महेशदादा लांडगे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रविभाऊ लांडगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महिलांसाठी आयोजित या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढविणाऱ्या सर्व मान्यवरांचे व नागरिकांचे मंडळाचे अध्यक्ष निरंजन लांडगे आणि आयोजकांच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

















