- नवरात्रोत्सवाला सामाजिक उपक्रमांची जोड..
- १४ वर्षांची ‘एक सोसायटी, एक उत्सव’ परंपरा कायम…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड-थेरगाव (दि. २२ ऑक्टोबर २०२६) :- वाकड-थेरगाव येथील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीने नवरात्रोत्सवानिमित्त रावणाच्या अकराव्या तोंडातून पाणीबचतीचा संदेश दिला. गेल्या १४ वर्षांपासून सोसायटीत धार्मिक उत्सवांसोबत सामाजिक जनजागृतीचे उपक्रम राबविले जात आहेत.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सोसायटीने गाड्या धुण्यावर बंदी घातली. एका लहान मुलीच्या रीलद्वारेही पाणीबचतीचे आवाहन करण्यात आले. रहिवासी व कवयित्री संध्या अमित टिंगरे यांनी ‘का हो आभाळ रुसलं?’ या कवितेतून शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. प्रमुख पाहुणे प्रवीण कदम यांनी मार्गदर्शन केले. योगेश पाटील यांनी पाणीबचतीचे महत्त्व अधोरेखित केले.
वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले आणि आयआयटी मुंबईशी संबंधित डॉ. अमोल पाटील यांच्या उपस्थितीत सामाजिक जागृती, सायबर सुरक्षा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या परिणामांवर मार्गदर्शन झाले.
महाप्रसाद, भंडारा, आनंद मेळा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बालकांचा सन्मानही करण्यात आला. कल्याणी मनोज चौधरी यांच्यासह महिला सदस्यांनी नियोजनात योगदान दिले.
‘एकच वादा अजित दादा!’ या जिवंत देखाव्याला सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६ मध्ये मुळशी तालुका गटात प्रथम क्रमांक मिळाला.
रावणनिर्मिती पथक: मयूर पवार (अध्यक्ष), उमेश पेंडभाजे (उपाध्यक्ष), चिंतन कंसारा (खजिनदार), अनमोल पाटील, मनोज चौधरी, सतीश कोलगे, अमोल वाघ, प्रभाकर कुमार, मयंक अग्रवाल, राहुल जहागीरदार, मनीषराज सत्य, हर्षल कोळी, सचिन आणि इतर रहिवाशांनी मेहनत घेतली.
१४ वर्षांच्या सामाजिक प्रवासातील योगदान: राजहंस पाटील, अविनाश देशमुख, राहुल दसरे, रिपेन भाई, विक्रम, वरद जोशी, रघु उज्जेनकर, जयप्रकाश नागमोडे, अमित टिंगरे, मुकेश बाफना, विघ्नेश नायक, सुबोध कुंभार, शिंत्री साहेब, कौस्तुभ भादेकर, विनय कुलकर्णी, रवींद्र उत्तेकर आणि निकम सर यांच्यासह अनेक स्वयंसेवकांचे योगदान लाभले.
२०१९ च्या महापुरात राजहंस पाटील आणि सुनील आचरे यांच्या पुढाकाराने पूरग्रस्तांना मदत करण्यात आली होती. सर्व रहिवाशांच्या सहभागातून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण जागृती आणि एकतेची परंपरा सोसायटीने जपली आहे.

















