न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी-चिंचवड (दि. २३ ऑक्टोबर २०२६) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीत ग्रीन झोन आणि कृषी क्षेत्रातील जमिनींचे प्लॉट पाडून विक्री केली जात असल्याच्या जाहिरातींची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.
चाकण, खेड, वाघोली, केसनंद, सणसवाडी, उरुळी कांचन, सासवड आणि पुरंदर विमानतळ परिसरातील गावांमध्ये अशा प्लॉटिंगचा सुळसुळाट आहे. सोशल मिडियावर फार्महाऊस, वीकेंड होम तसेच निवासी बांधकामासाठी प्लॉट उपलब्ध असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.
ग्रीन झोन किंवा कृषी क्षेत्रातील जमिनीवर केवळ ग्रामपंचायतीच्या परवानगीने घर बांधता येते का, तसेच प्लॉटिंग आणि लेआउटसाठी आवश्यक मंजुरी घेतली आहे का, याची पडताळणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावनिहाय आणि गट क्रमांकनिहाय सर्वेक्षण करून अनधिकृत प्लॉटिंग आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.


















