न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाकड (दि. २५ ऑक्टोबर २०२६) :- वाकड येथील एक्स्प्रेस वेवर हॉटेल जिंजरसमोर मोठा अपघात घडला. महामार्गावर एक ट्रक पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली.
महामार्गावर ट्रक पलटी झाल्याने परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघात पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हा अपघात नेमका कशामुळे घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
या दुर्घटनेत कोणी जखमी झाले आहे का, तसेच ट्रक पलटी झाल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे का, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.

















