न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जून २०१९) :- पाटील यांचा वॉटर हिटरचा व्यवसाय आहे. त्यांचे संतनगर मोशी येथे गोडाऊन आहे. त्यांचे गोडाऊन २ जून ते १४ जून या कालावधीत बंद होते. दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीच्या सहाय्याने गोडाऊनचा दरवाजा उघडला. कंपनीतून विविध आकाराचे २ लाख ४६ हजार ६५० रुपये किमतीचे ६२ वॉटर हिटर चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना २ जून ते १४ जून या कालावधीत संतनगर मोशी येथे घडली.
गणपतीगौडा सिदगौडा पाटील (वय ४१, रा. संतनगर मोशी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.











