न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- काळेवाडी तापकीर नगर येथे प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर हनुमंत तापकीर यांनी पारंपरिक व ढोल ताशाच्या व भंडाऱ्याची उधळण व फटाक्याची अतिषबाजी करत बैल पोळा साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांचे बंधू स्वीकृत नगरसेवक विनोद तापकीर व त्यांच्या मातोश्री उल्हासाबाई हनुमंत तापकीर, युवा उद्योजक निलेश तापकीर, नवीन तापकीर, निखिल जाधव, रोहन जाधव, अमोल देवकर, अर्चना तापकीर, अनिता तापकीर, माया तापकीर, प्रज्ञा तापकीर, पूजा तापकीर, विद्या तापकीर, राम तापकीर, हर्षल तापकीर, विराज तापकीर, शिवाय तापकीर, शिवेंद्र तापकीर आदी उपस्थित होते.
बैलपोळानिमित्त तापकीरनगरमध्ये आनंदमय वातावरण होते. तापकीरनगरमधील लोकांनी एक गावाकडील सण हा शहरात साजरा केला. तापकीरनगर मधील लोकांनी प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर तापकीर यांचे कौतुक केले व घरोघरी त्यांच्या बैलांचे पूजन केले.











