न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- मंगळवार पेठ येथील जाहिरात फलक पडुन झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांना तसेच गंभीर जखमींच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री निधीतुन आर्थिक मदत मिळावी. अशी मागणी ऑटो रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समितीचे महाराष्ट्र सरचिटणीस आणि महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ससून येथील आय. सी. यू. मध्ये जाऊन उमेश मोरे या अपघातग्रस्त रिक्षा चालकांची भेट घेतली आणि त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले.
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जाहिरात फलक दुर्घटनेतील मुत्यु पावलेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना ५० लाख रुपये तर गंभीर जखमींना २५ लाख रुपये निधी मिळावा व दुर्घटनेस जबाबदार रेल्वे प्रशासन आणि पुणे महानगरपालिका अधिकारी यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा याबाबत जिल्हाधिकारी यांना कळकळीची विनंती केली आहे.
यावेळी प्रियदर्शनी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आनंद तांबे, शिवाजीनगर एस.टी. स्टॅन्ड रिक्षा संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सदाशिव पाटील आदी उपस्थित होते.
दुर्घटना बाधितांना मुख्यमंत्री सहायता निधीमार्फत आर्थिक मदत करणार.
पुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम












