न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिखली येथील पोलीस स्टेशनचे उद्घाटन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महापौर राहूल जाधव, पोलीस आयुक्त आर. के. पज्ञनाभन, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर, नगरसेवक, पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले की, शहरातील नूतन पोलीस आयुक्तालयाच्या ज्या काही समस्या असतील त्या राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री व पोलीस महासंचालक यांच्याशी सल्लामसलत करून व बैठकीद्वारे सोडवण्यात येतील.











